Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यास दोन वर्षाची शिक्षा
    क्राईम

    बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्यास दोन वर्षाची शिक्षा

    saimat teamBy saimat teamNovember 10, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । बस प्रवासात अर्धे तिकीटाचे कार्ड नसतांना अर्धे तिकीट काढून बस वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी प्रवाश्याला दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली आहे.

    तुळशीराम हरलाल राठोड (वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ सप्टेबर २०१८ रोजी तुळशीराम हरलाल राठोड हा चाळीसगाव-मालेगाव बसमध्ये (एमएच १९ बीटी १३४२) बसला होता. बसमध्ये चालक महेश देवचंद चव्हाण हे कामावर होते. वाहक महेश चव्हाण यांनी तिकीटासंदर्भात प्रवाशी तुळशीराम राठोडला विचारणा केली असता अर्धे तिकीटासाठी लागणारे एसटी महामंडळाचे किंवा पुरावा म्हणून काहीही नसतांना राठोडने अर्धे तिकीट मागितले. अर्धे तिकीटासाठी लागणारे कार्ड जवळ नसल्यामुळे पुर्ण तिकीट काढावे लागेल असे वाहक चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारहाण केली व शिवीगाळ केली. ‘तुझ्याकडून काय होते ते करुन घे’ असे म्हणत धमकी दिली होती. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारपक्षाने एकुण ८ साक्षीदार तपासले. युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने तुळशीराम राठोड याला दोषी धरुन दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.