जळगाव : प्रतिनिधी
बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देण्यात आले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे निधी समर्पण अभियान सुरू आहे. १० फेब्रुवारी रोजी दिल्ली शहरातील मंगोलपुरी भागातील बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा हे इतर कार्यकर्त्यांसोबत निधी संग्रह करून घरी आले असता काही समाज कंटकांनी त्यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला केला. यात रिंकू शर्मा यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या वेळी देवेंद्र भावसार, राकेश लोहार, रवींद्र नन्नवरे, हरीश कोल्हे, समाधान पाटील, बापू माळी, सागर साबळे, दीपक दाभाडे, चेतन शिंपी आदी उपस्थित होते.
