बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने तरुणाची दहा हजाराची ऑनलाईन फसवणूक

0
49

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील असोदा रोड येथे राहणाऱ्या तरुणाची बँकेच्या खाते व्हेरिफिकेशनच्या नावाने दहा हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना २८ रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेतून बोलत असल्याचे भासवत बँकेचे खाते व्हेरिफिकेशन नावाने सायबर चोरट्यांनी जळगावातील आसोदा रोड परिसरातील तरूणाला ऑनलाईन गंडा घातलाय. १० हजार १५४ रुपयात तरूणांची फसवणूक झाली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आसोदा रोड परिसरात विशाल विनोद कोळी वय २३ हा तरुण वास्तव्यास आहे. विशाल हा बेंडाळे कॉम्प्लेक्समधील श्री ऑनलाईन सर्व्हिस शॉप या दुकानावर असतांना त्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आयडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे भासवत त्यांनी विशालला सिव्हिल व्हेरिफिकेशन अँपची बतावणी केली. त्याद्वारे अनोळखींनी विशालच्या बँक खात्याची माहिती घेत एका लींकद्वारे त्याच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन १० हजार १५४ रुपये काढुन घेतले. २८ जानेवारी रोजी घडलेली घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी विशालच्या लक्षात आल्याने त्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून फोनवर बोलणाऱ्या अनोळखी संजीव शर्मा नामक व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोना रूस्तम तडवी हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here