फैजपूर नगरपरिषदेच्या विविध कामांची तपासणी करा

0
17

यावल ः तालुका प्रतिनिधी
फैजपूर नगर परिषदेकडून झालेल्या विविध कामांची तपासणी करणेबाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. २२ डिसेंबर २० रोजी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. तक्रारदाराने मागणी केलेल्या कामाचे तपासणी शुल्क ५लाख १५ हजार ७०० रुपये फैजपुर नगरपरिषदेने दि.१३/१२/२०१९आणि दि.२६/६/२०२०रोजी ६लाख ३२ हजार असे एकूण ११लाख ४७ हजार रुपये अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे भरणा केलेला आहे परंतु अद्याप चौकशी अहवाल अप्राप्त असल्याचे तसेच तक्रारदार चौकशी अहवालाबाबत तगादा लावत असल्याचे सुद्धा त्यात नमूद करण्यात आले आहे.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की फैजपुर नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत दाडी नदीचे सुशोभीकरण करणे(कामे संख्या-४),कांग्रेस अधिवेशन १९३६ चे संकल्प चित्र उभारणी काम, शहरातील ओपन स्पेस व बगीच्यामध्ये खेळणी व व्यायाम साहित्य पुरविणे/बसवून देणे(कामे संख्या-४)निविदा मॅनेज करणे इत्यादी गंभीर विषयासंदर्भात ललित कुमार चौधरी यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि१८/८/२०१८रोजी रितसर लेखी तक्रार केली होती आणि आहे. जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रांत फैजपूर यांच्यामार्फत चौकशी करून कार्यवाही केलेली आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक मुख्य अभियंता यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी दि.२२/१२/२०२० रोजी पत्र दिले आहे.
त्यात वरील मुद्दे नमूद करण्यात आले असून सदर विषय प्रलंबित असल्याने जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत निर्णय घेता येत नाही तरी प्रस्तुत प्रकरणी तात्काळ कार्यवाही होणे बाबत आपले स्तरावरून संबंधितांना चौकशी अहवाल जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करणे कामी कळविण्यात यावे असे म्हटलेले आहे.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या पत्रानुसार नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता हे नाशिक येथील दक्षता व गुण नियंत्रण मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडून अहवाल पाठविणे संदर्भात काय कारवाई करतात आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे अहवाल कधी पाठविणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.
तसेच तत्कालीन मुख्याधिकारी,नगरपरिषद बांधकाम कनिष्ठ अभियंता,अध्यक्षा व काही नगरसेवकांचा संगनमताने मक्तेदारासोबत सहभाग? होता किंवा नाही? आणि असल्यास त्यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here