जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या महामारी मुळे सर्वच शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने घेतला जातोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगावच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व घरात बसून निर्माण झालेला आळस दूर व्हावा व मनोरंजनाचे एक साधन मिळावे आणि त्यातूनच विद्यार्थी घडावा या उद्दिष्टाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेे आहे.
सदर कला महोत्सव हा १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राबवला जाणार असून त्यासाठी चित्र कला ,कार्यानुभव ,मिमिक्री ,एकल गायन ,वाद्य वादन ,एकल नृत्य, बालगीते, कोळी गीते ,देशभक्तीपर गीते ,शेतकरी नृत्य, भांगडा ,गुजराती नृत्य या सर्व प्रकारच्या कलागुणांचे प्रदर्शन विद्यार्थ्यां मार्फत कला महोत्सवामध्ये केले जाणार आहे. त्यासाठी शाळेतील विविध इयत्तेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे विषय देऊन त्यांच्याकडून सदर कलागुणांचे फोटो आणि व्हिडिओ शाळेतर्फे मागवले गेलेले आहेत आणि त्यांचं प्रक्षेपण दिनांक ३ ते ६ मार्च दरम्यान केले जाणार आहे.
आज केसीई सोसायटीचे शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक मा.चंद्रकांत भंडारी , मा.चंद्रकला सिंग , मा.स्मिता कुळकर्णी , मा.दिलीप कुमार चौधरी तसेच मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटनाचे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन स्वाती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले.याप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव , सरला पाटील, धनश्री फालक सूर्यकांत पाटील, दिपाली चौधरी , इंदू राणे अशोक चौधरी , देवेंद्र चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.