अमळनेर ः प्रतिनिधी
तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी व वसंतनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील उपक्रमशील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष पत्रकार प्रा. हिरालाल पाटील यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले असून त्यांना दि.१० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यात युवा चळवळीत कार्य करणार्या युवकमित्र परिवारातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी संमेलनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कळमसरे (ता.अमळनेर) येथील प्रा.हिरालाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
दि.१० जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुस्तक व गुलाबपुष्प भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी पूर्वी प्रा.हिरालाल पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या निवडीबद्दल वसंतराव नाईक ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य डी.एम.पाटील, मुख्याध्यापक सोपान पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संभाजी देवरे, जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, कुंदन खैरनार, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, महेंद्र रामोशी, जितेंद्र ठाकूर, संजय पाटील, गौरवकुमार पाटील, गजानन पाटील, विलास पाटील, यदुविर पाटील, गौतम बिराडे व कळमसरेसह परिसरातील मित्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.