प्रायोगिक रंगभूमीचा महाराष्ट्रातील आवाज म्हणजे परिवर्तन जळगाव

0
26

जळगाव ः प्रतिनिधी
मराठी प्रायोगिक रंगभूमी व एकूणच चळवळी लोप होण्याच्या काळात जळगाव सारख्या छोट्याशा शहरातून प्रायोगिक रंगभूमीला महाराष्ट्र भर आवाज देण्याचं काम परिवर्तन जळगाव करीत आहे हे अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याचे मत साहित्य संस्कृतीचे अभ्यासक उल्हास दादा पवार यांनी काल पुणे येथे आयोजित परिवर्तन कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी लेखक सुधीर भोंगळे, प्रत्रकार विजय बाविस्कर, आशुतोष पोतदार, शुभांगी दामले,आयोजक अतुल पेठे व परिवर्तनच्या मंजुषा भिडे मंचावर उपस्थित होत्या.
परिवर्तन कला महोत्सवाची सुरुवात ‘अमृता साहिर इमरोज’ या शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित नाटकाने झाली. अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित हे नाटक वास्तव व आभासी जग यांचं अत्यंत विहंगम दृश्य आज रसिकांनी अनुभवले . प्रायोगिक रंगभूमी वरील अनेक शक्यता या नाटकाच्या माध्यमातून रसिकांना जाणवल्या व या नाटकाचा इतिहास व समकालीन जीवन याची सांगड घालून केलेला हा प्रयोग एक समृद्ध करणारा अनुभव होता. यात शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांनी भूमिका वठवल्या.
यानंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तिचित्रणावर आधारित व शंभू पाटील नाट्य रुपांतरीत ‘नली’ एकलनाट्य सादर करण्यात आले. योगेश पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने शेती, ग्रामीण भागातील लोकजीवन, शिक्षण यासोबतच मातीशी निगडित प्रश्नांची अनोखी मांडणी या नाटकात करण्यात आली.या एकलनाट्याचा ४७ वा प्रयोग महोत्सवात हर्षल पाटील यांनी सादर केला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिळाला. प्रयोग हाऊस फुल्ल होता. या कला महोत्सवाचे आयोजन नाटकघर पुणे व अतुल पेठे यांनी केले आहे.
महोत्सवात आज महाश्वेता देवी यांना समर्पित ‘कुरुक्षेत्रानंतर’ या नाटकाचा प्रयोग सायंकाळी ७ वा. जोत्स्ना भोळे सभागृहात सादर होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here