प्रशांत कोरटकरच्या विरोधातील तक्रार
कोल्हापुरच्या गुन्ह्यात समाविष्ट होणार
अमळनेर (प्रतिनिधी)-
छत्रपती शिवराय व संभाजी महाराजांवर गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूर येथे दाखल गुन्ह्यात अमळनेर बहुजन समाजाची तक्रार समाविष्ट करून घेतो असे आश्वासन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिष्टमंडळाला दिल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला.
प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने अमळनेर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. गुन्हा दाखल होत नसल्याने समाज आक्रमक झाला होता. त्यावेळी डिवायएसपी विनायक कोते व प्रभारी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी बहुजन समाजाला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बोलावल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने शनिवारी रेड्डी यांची भेट घेतली गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला त्यावेळी रेड्डी यांनी कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पंडित यांनी अमळनेर ची तक्रार कोल्हापूरच्या गुन्ह्यात समाविष्ट करून घेतो असे आश्वासन दिले आणि मोर्चा न काढण्याचे आवाहन केले.
या शिष्टमंडळात प्रशांत निकम , अँड . दिनेश पाटील , मनोहर निकम, महेश पाटील, कैलास पाटील, दीपक काटे, दयाराम पाटील यांचा समावेश होता.