प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून घ्यावेत उपचार ः डॉ.रामानंद

0
19

जळगाव : प्रतिनिधी
कोरोना काळात काम करीत असताना अनेक बदल करावे लागले. त्यासाठी कठोर शिस्त आणि नियोजन करावे लागले. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय यंत्रणा सक्षम केली. यासह महाविद्यालय व रुग्णालयातील त्रुटी दूर करून आज कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवले आहे. जिल्हा रुग्णालय हे सामान्यांचे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वयंशिस्त पाळून उपचार घ्यावेत, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे कोरोना काळात वैद्यकीय सेवा देणार्‍या ४५ कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, डॉ. धर्मेंद्र पाटील, कोविड केअर सेंटर उपप्रमुख डॉ. शिरीष ठुसे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघ जिल्हाध्यक्ष अमला पाठक आदी उपस्थित होते. अशोक वाघ यांनी प्रास्तविक केले. पीयुष रावळ व अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी आभार मानले.
४५ कोरोना योध्दांचा सन्मान
डॉक्टर,नर्स, समाजसेवक अशा ४५ कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.त्यात मनपा कोविड सेंटर उपप्रमुख डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नीलेश राव,डॉ. दीपिका ओक, डॉ. तुषार उपाध्ये,डॉ.अमृता देशपांडे, गोदावरी जनसंपर्क अधिकारी राहुल कुलकर्णी,
डॉ.अश्‍विनी टेणी, लक्ष्मीकांत त्रिपाठी डॉ. सुभाष वडोदकर,डॉ.क्षितीज गर्ग आदींचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here