पोलीस अधिक्षक मुंडे यांनी स्वतः धाडी टाकल्या, तरीही अवैध धंदे पुन्हा सुरू कसे ?

0
22

जळगाव, विशेष प्रतिनिधी । गेल्या 4 जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर येत शहर आणि परिसरातील तब्बल 9 सट्टा व जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या होत्या.त्या कारवाईत 29 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.एसपींच्या त्या कारवाईचे सर्वत्र कौतुक,अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले होते.शहरातूनच नव्हे ,तर जिल्ह्यातून आता अवैध धंदे हद्दपार होतील असा तेव्हा कयास लावला जात होता मात्र काही दिवसांनीच शहर व परिसरात सट्टा-जुगाराचे अड्डे नव्या जोमात सुरू झालेले दिसत आहेत.त्यावरून एसपी साहेबांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे व हे धंदे पुन्हा सुरू कसे ?असा प्रश्न जळगावकर विचारू लागले आहेत.

वास्तविक जिल्हा पोलीस दलातील नियमानुसार व डीएसपी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ताकीदनुसार 4 जानेवारी रोजी डीएसपी मुंडे यांनी ज्या 9 अड्ड्यांवर धाडी टाकल्या ते अड्डे ज्या-ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येत होते त्या-त्या पोलीस ठाणे निरीक्षक मंडळींवर यथोचित कारवाई होणे अपेक्षित होते.अर्थात ज्या सर्व 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत डीएसपींनी धाडी टाकल्या त्या शहर,शनीपेठ,जिल्हापेठ,औद्योगिक वसाहत,तालुका पोलीस व रामानंद पोलीस ठाणे या सहाही पोलीस ठाणे निरीक्षकांना मुख्यालयात पाठवायला हवे होते.मात्र तशी कारवाई एसपी मुंडे यांनी केली नाही, की,जाणीवपूर्वक केली नाही .निरीक्षकांवर तशी कारवाई न झाल्याने एसपींच्या धाड सत्रावर बोट उचलले जात आहे आणि विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत.

विशेष की,तसे अवैध धंदे चार-पाच दिवसांपासून पुन्हा नव्या जोमात सुरू झाल्याने व सुरू असलेले दिसत असल्याने “अंदर की बात “ स्पष्ट होत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यांबद्दल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या.उल्लेखनीय की,शहराच्या जुन्या बसस्थानका नजीकच्या एका जुगाराच्या अड्ड्यावर अप्पर पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी धाड टाकली.तो अड्डा नेमका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ? यांचा होता.त्यावरून वाद पेटला होता.त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांबद्दल तक्रारी झाल्या.गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात माजीमंत्री खडसे यांच्या कन्या, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व संचालिका रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी आवाज उठविला होता.

रोहिणी यांचा रोख तेथील विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे होता हे विशेष.त्यांनतर शाब्दिक चकमकी झाल्या होत्या.पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या. नंतर रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या कारवर हल्ला करण्यात आला.

त्याबद्दल सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर संशय व्यक्त केला गेला.त्याच्याही तक्रारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.या साऱ्याचं मूळ होत अवैधधंदे. जिल्ह्यात अवैध धंद्यांबद्दल असे तक्रारींचे वादळ सुरू असतांनाच आपले जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. प्रवीण मुंडे यांनी एकदम लक्षवेधी कामगिरी बजावली.4 जानेवारी रोजी त्यांनी शहरातील कोणत्याही पोलीस ठाणे प्रभारी अर्थात निरीक्षकांना चाहूल न लागू देता फक्त स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बकाले यांना व त्यांच्या पथकाला सोबत घेत शहर परिसरातील तब्बल 9 सट्टा व जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या.त्या कारवाईत 29 जुगारी -सटोडियेपकडले गेले आणि लाखो रुपये रोख व मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

एसपींच्या या कारवाईचे लोकांनी जिल्हाभरात कौतुक केले,त्यांचे अभिनन्दन केले होते तर पोलीस दलात मोठीच खळबळ माजली होती.त्या कारवाई नंतर दोन गोष्टी अपेक्षित होत्या.एक म्हणजे जिल्ह्यातून व शहरातून सट्टा जुगारासारखे अवैध धंदे एकदम हद्दपार होतील व दुसरी म्हणजे ज्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या धाडी पडल्या त्या-त्या ठाणे निरीक्षकांवर मुंडे साहेब कारवाईचा बडगा उगारतील.किमान त्या निरीक्षकांना पोलीस मुख्यालयात पाठविण्यात येईल अशी अपेक्षा लोकांना होती. परंतु या दोन्हीही अपेक्षा फोल ठरतांना दिसत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील तसेच खेडीसारख्या विस्तारीत भागातील सट्टा-जुगाराचे अड्डे पूर्वरत सुरू झालेले दिसत आहेत तर येथील त्या शहर,शनीपेठ,जिल्हापेठ,औद्योगिक वसाहत ,रामानंद आणि तालुका पोलीस ठाण्यांचे निरीक्षक आपापल्या पोलीस ठाण्यात गुण्यागोविंदयाने कारभार करीत आहेत. डीएसपींनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, हा शहरातील लोकांचा प्रश्न आहे. खरे तर डीएसपी स्वतः रस्त्यावर येत जेव्हा अशाप्रकारची कारवाई करतात तेव्हा ते जोपर्यंत येथे कार्यरत असतील तोवर तसे धंदे अजिबात चालायला नको.अवैध व्यवसायिक मंडळीत त्यांच्या नावाची धडकी भरायला हवी होती. आजतरी तसे काहीच झालेले दिसत नाही हे सट्टा खुलेआम सुरू असल्याचे पाहून म्हणावे लागते.

जिह्याच्या अवैध व्यवसाईकात आजही तत्कालीन डीएसपी दीपक जोग,अप्पर पोलीस अधीक्षक व नंतर पोलीस अधीक्षक म्हणून आलेले टी.एस. भाल यांच्या नावाची भीती आहे.तद्वतच तत्कालीन अधीक्षक संतोष रस्तोगी यांचाही दरारा आजही कायम आहे.त्यांनीही स्वतः रस्त्यावर येत येथे सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा मंडळांच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून मोठ्या मास्यांना गजाआड केले होते व तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उप विभागीय पोलीस अधिकारी अविनाश अंबुरे यांना कारवाईच्या कक्षेत घेतले होते.

एखाद्या चित्रपटात कोणीतरी पोलीस अधिकारी आल्याआल्या किंवा नव्या नियुक्तीच्या ठिकाणी प्रचंड दरारा निर्माण करतो.दादागिरी ,गुंडगिरी करणारे.अवैध व्यवसाय करणारांवर जबर कारवाई करतो मात्र नंतर “भाव वाढ“झाल्यावर सारे काही पूर्ववत होते असे आपण प्रेक्षक म्हणून पाहत आलो आहोत.कदाचित असाही संशय किंवा चर्चा जळगावातील धाडी वरून होऊ लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here