जळगाव ः प्रतिनिधी
शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता जळगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरत वाहनांची कसून चौकशी सुरू केली आहे वाहनाच्या कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही ? यासंदर्भात बारकाईने तपासणी करण्यात येत आहे.
शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी आपल्या प्रभागातील भागांमध्ये जाऊन वाहनांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये वाहनांची कागदांची पूर्तता आहे की नाही. नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी दिले आहेत. आज जळगाव शहरातील कांचननगर परिसर, तांबापुरा, गेंदालाल मिल परिसर, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको , शनिपेठ, मास्टर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या प्रभागांमध्ये पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अधिक माहिती दिली.