जळगाव प्रतिनिधी । पैशांसाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कांचननगरातील उज्ज्वल चौकातील छाया यांचा वरणगाव येथील धनराज सोपान कोळी यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहिता छाया हिच्याकडे माहेरून तीन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. याच कारणावरून वेळोवेळी सासरच्यांनी तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारीरिक तसेच मानसिक छळ केला. तसेच आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुला तसेच तुझ्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकीही छाया हिस सासरच्यांनी दिली. छळ असह्य झाल्याने छाया कोळी या कांचननगरातील माहेरी आल्या.
याप्रकरणी छाया धनराज कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती धनराज सोपान कोळी (वय ३६), सासरे सोपान वना कोळी (वय-५५), सासू पुष्पा सोपान कोळी (वय -५०) तिन्ही रा. जगदंबानगर वरणगाव व दीर कृष्णा सोपान कोळी (वय-३३) या चार जणांविरुध्द सोमवारी शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
