चाळीसगाव : प्रतिनिधी
पाटणादेवी मंदिर येथील ट्रस्टच्या चौकशीबाबत साईमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच पुरातन विभागाच्या अधिकार्यांचे धाबे दणाणले असून ट्रस्टची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
पाटणादेवी मंदिर येथील ट्रस्ट धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्यामार्फत रजिस्टर झालेली संस्था ही कुठल्या आधारे रजिस्टर करण्यात आली.नावातच परिसर असताना ही संस्था या संस्थेने भारतीय पुरातत्व मालकीहक्काचा मंदिरावर फलक कुणाच्या आदेशाने अथवा परवानगीने लावण्यात आला. ही संस्था पाटणादेवी गाव पातळीवर असल्याने व संस्था रजिस्टर करताना संस्थेचे ध्येय धोरणे आणि संहिता ही नेमकी कोणती व काय आहत याचीही उलट तपासणी करण्यात यावी.संस्था मान्यतेदरम्यान वन्यजीव पाटणादेवी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांची नाहरकत शिवाय मान्यता देण्यात आली.या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात यावा व सदर बोर्ड ताबडतोब पाठवण्याचा आदेश करण्यात यावा कारण मागेही अन्नदानाच्या नावाखाली दानपेटी ठेवण्यात आली होती परंतु कुणालाही एक पाव वडा, बटाटावडा देखील देण्यात आला नव्हता.याठिकाणी अन्नदान कधी कसे व कोणामार्फत करण्यात येईल,यासंदर्भात कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.अन्नदान कधी केले जाईल, त्याच्यात मेनु काय असणार, त्या खर्चाची जबाबदारी व त्याचा तपशिल यासंदर्भात कुठलीही माहिती जनहितार्थ जाहीर करण्यात आलेली नाही. या बाबींचीही उलट तपासणी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे
यासंदर्भातील वृत्त दैनिक साईमतला छापताच नाशिक येथील पुरातन कार्यालयाचे संबंधित अधिकारी व बेकायदेशीर ट्रस्टी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. अजून काही माहिती पुढे येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
