Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»पुणे – सातारा रस्त्यावरील टोल पूर्णपणे रद्द – नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
    राज्य

    पुणे – सातारा रस्त्यावरील टोल पूर्णपणे रद्द – नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

    saimat teamBy saimat teamSeptember 24, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, वृत्तसंस्था । पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करून रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येईल. तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

    राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ.निलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते.

    पुणे – बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा
    पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या दोन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे बंगळुरु महामार्ग. “पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्याचे कंजेशन कमी होईल”, असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. लवकरच, आम्ही या महामार्गाचे प्रेझेंटेशन महाराष्ट्र सरकारला देऊ आणि कामाला सुरुवात करू तसेच पुण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

    यामुळे पुणे- मुंबईची वाहतूक कोंडी कमी होईल
    नितीन गडकरी यांनी यावेळी पुण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या आणखी एका महामार्गाची माहिती दिली आहे. “दक्षिणेतील म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ याचा उत्तरेतील म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सगळं ट्राफिक मुंबईहून पुण्याला येतं. आम्ही ठरवलंय की हे सगळं ट्राफिक सुरतलाच थांबवू. त्यानंतर, सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर, अहमदनगरहून सोलापूर आणि सोलापूरहून अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा हा महामार्ग १२७० किलोमीटरचा असेल. ह्यावर आम्ही ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे, मुंबई-पुण्याचं हे सगळं ट्राफिक कमी होईल. हा ग्रीन महामार्ग आहे. याची सध्याची लांबी १६०० किलोमीटर इतकी आहे. ती कमी होऊन १२७० किमी होईल. यामुळे नवीन दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

    रिंगरोडचे बांधकाम आम्ही करू
    पुण्यात रिंगरोडचे काम सुरू आहे. पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेल्या या रिंगरोडचे भूसंपादन करून दिल्यास पुढील सर्व खर्च व बांधकाम आम्ही करू असे देखील नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. तसेच दोन्ही पालखी मार्गांचे काम देखील लवकरच पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.