जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक ८ रोजी शनिवार रोजी पी.ई. तात्या पाटील एज्युकेशन फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मालय येथील गरजू असलेल्या वस्ती तांड्यावर ब्लँकेट्स वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी पी ई तात्या मेडिकल कॉलेजचे संचालक पी ई तात्या पाटील, निर्मला पाटील पद्मालय ट्रस्ट संस्थानचे आनंदा पाटील व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी अध्यक्षा मनिषा पाटील व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते हिवाळा ऋतूतील गरज पाहता ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी जायंटस् ग्रूप जळगावच्या नूतन तासखेडकर, ॲड सीमा जाधव, भारती कापडणे, विभावरी पाटील, किमया पाटील,, भावना चौहान मनीषा एस पाटील उपस्थित राहून ब्लँकेट वाटप केले. यावेळी सुत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे व आभार इंदिरा जाधव यांनी मानले.