जळगाव | जिल्हा महिला असोसिएशनच्या सदस्या व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव अंजली पाटील यांची जळगाव महानगरपालिकेच्या गर्भधारणा पूर्व आणि जन्म पूर्व निदान प्रतिबंध कायदा(पीसीपीएनडीटी) सल्लागार समिती वर निवड करण्यात आली आहे.
अंजली पाटील या २५ वर्षापासून व्यसनमुक्ती व महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी अंजली पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे साहेबराव पाटील, सुधीर वसाने यांनी अभिनंदन केले आहे.