चाळीसगाव, प्रतिनिधी । “मुस्लीम समाजाच्या हक्काची कब्रस्थान ची जागा मिळविण्यासाठी आमच्या अनेक पिढ्या थकल्या, सरकार दरबारी फेऱ्या मारल्या, १० वर्ष कोर्ट कचेऱ्या केल्या ज्या अजून सुरूच आहेत, या काळात अनेक लोकप्रतिनिधी, आमदार आले आणि गेले, अनेकांनी एक शब्द टाकला असता तरी काम झाले असते मात्र त्यांनी ते जाणूनबुजून केले नाही, मात्र आमदार मंगेशदादा तुम्ही आमच्यासाठी फरीस्ता बनून आलात, ६५ वर्षापासून साधी मोजणी देखील न झालेल्या जागेची मोजणी करून त्याची हद्द कायम करून दिली, एव्हडेच नव्हे तर या जागेला शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने तार कंपाऊंड करून देत आहात, मुस्लीम समाज आपले हे काम कधीच विसरणार नाही” अश्या शब्दात भावना व्यक्त केल्यात चाळीसगाव शहरातील मुस्लीम समाजातील विविध मान्यवरांनी, निमित्त होते चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा यांच्या दर्ग्याजवळील ६५ वर्षापासून वादात असलेल्या कब्रस्थान येथील जागेवर तार कंपाउंड कामाचे भूमिपूजनाचे व मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे…
आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून स्वखर्चाने होत असलेल्या कामाच्या ईप्तेदा (भूमिपूजन) कार्यक्रमाला मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष गफूर हाजी पेहलवान, माजी नगरसेवक चिराग शेख, फकिरा बेग मिर्झा, इंद्रिस दादा मुजावर, ट्रस्टी रेहमान मामु शेख, ट्रस्ट सेक्रेटरी अनवर शेख, ट्रस्टी लुकमान बेग, ट्रस्टी हाफिज ड्रायव्हर, ट्रस्टी जावेद कागजी, ट्रस्टी जाकीर शेख, ट्रस्टी शाकिर भाई, इम्रान मेम्बर, कैसर खाटीक, अकिल मेम्बर, असगर भाई सैय्यद, पंचायत समिती गटनेते संजू भास्करराव पाटील, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, सदानंद चौधरी,भास्कर पाटील, बापू अहिरे , चंदू तायडे, संगीताताई गवळी, बबन पवार , प्रभाकर चौधरीं, मंजूर हाजी, विजय जाधव, संभाजी जाधव, वसीम चेअरमन, आरिफ सैय्यद, अलाउद्दीन दादा, अखलाक खाटीक, अमोल चौधरी, बिलाल काकर, सैय्यफ सलीम, लुकमान शाह, प्रदीप राजपूत, बंडू पगार, हुसेन भाई अग्रवाल, तन्वीर भाई, अस्लम मिर्झा, इर्फान कुरेशी, समीर शेख, छोटा इकबाल कुरेशी, छोटा व्यापारी, छोटू पहेलवान, सुमित भोसले,
सूत्रसंचालन अफसर खाटीक सर यांनी केले तर एड.कैलास आगोणे वकील यांनी या कामासाठी वाळू देणार म्हणून सांगितले तर बारकू नाना जाधव यांनी खडी देण्यासंदर्भात जाहीर केले.
आमदार मंगेश दादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वर्षांनंतर गट तट विसरून मुस्लिम समाज कब्रस्थान जागा निमित्ताने एकत्र आलेला पाहायला मिळाला.
मुस्लिम समाजातील सर्व मंडळांच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, गेल्या ३०० वर्षांपासून हिंदू मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतिक असणाऱ्या पीर मुसा कादरी बाबा यांच्या आशिर्वादाने आणि
सर्वांच्या सहकार्याने आज हे कब्रस्थान तार कंपाउंड कामाचे भूमिपूजन होत असून ही जागा पीर मुसा कादरी बाबांची होती त्यांचीच जागा त्यांना परत देण्या इतका मी मोठा नाही,
मागील काळात जे झाले त्यात न जाता पुढे काय करता येईल यावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आता वेळ आली आहे.
आजपर्यंत निवडणूका आल्या की काही लोक मुस्लिम समाजाची माथी भडकवतात मात्र काम करण्यासाठी कुणी येत नाही. राजकारणासाठी समाजात फूट पाडून आपला स्वार्थ साधला जातो.
त्यामुळे मी ठरवले आहे की यापुढे “वादे नहीं तो इरादे लेकर काम करना है” त्यासाठी समाजातील जेष्ठ कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन घेत तरुणांसोबत समाजासाठी काम करावे लागेल.
मी जेव्हा मोहल्ला मध्ये जातो तेव्हा मुस्लिम समाजातील वार्ड ची अवस्था बघून वाईट वाटते. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर देखील परिस्थिती का बदलली नाही याचा आता समाजाने विचार करावा.
माझा पहिला ड्रायव्हर हा मुस्लिम होता, माझा मुंबई येथील स्विय्य सहाय्यक हा देखील मुस्लिम आहे,
दिवाली मे अली, रमझान मे राम मानणारा मी आहे,
धर्मापेक्षा मी मानवते वर विश्वास ठेवतो.
मुस्लिम समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी.
समाजाच्या सर्व समस्या मी सोडवू नाही शकत मात्र मी पीर मुसा कादरी बाबांच्या कृपेने पुढील काळात मुस्लिम समाजातील शिक्षण, आरोग्य यासाठी काम उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
सदर जागे बाबत न्यायालयात दावा सुरू असला तरी समाजाच्या हक्काच्या जागेसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. मात्र हे सर्व करत असतांना सर्वांनी जागेच्या जवळ असणारी थोडीफार अतिक्रमणे यांचा सहानुभूतीने विचार करून निर्णय घ्यावा, तसेच कब्रस्थान कामांमुळे आजूबाजूला त्रास होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे.
कब्रस्थान चे रस्ते व इतर सुविधा बाबत अल्पसंख्याक मंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली असून जास्तीत जास्त निधी मिळवून देणार असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी जाहीर केले.
यावेळी मुस्लिम समाजातील अनेक मान्यवरांनी आपल्या भावना मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
माजी नगरसेवक चिराग शेख मेम्बर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या काळात नगरपालिका माध्यमातून पीर मुसा कादरी बाबा दर्गा विकासासाठी निधी आणला गेला मात्र विरोधकांनी त्यात खोडा घातल्याने तो निधी अजूनही नगरपालिका कडे पडून असल्याचे सांगितले, मात्र सदर जागेबाबत आम्ही मंगेशदादा यांना भेटताच त्यांनी तात्काळ भूमी अभिलेख अधिकारी यांना बोलावून घेतले व तात्काळ जागा मोजणी करून घेतली व जागेवर असलेली झाडे झुडपे स्वच्छता करण्यासाठी २ जेसीबी देखील तात्काळ पाठवून दिले असे सांगितले.
मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी गफार पेहलवान यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून ट्रस्ट च्या माध्यमातून सदर जागेसाठी संघर्ष केला, त्यासाठी औरंगाबाद येथे कोर्टात जाणे येणे झाले,अनेक कष्ट घेतले. आणि मंगेशदादा सारखा फरीस्ता बाबाने पाठवला आणि आज जागेच्या अनेक अडचणी त्यांच्या मध्यस्थीने दूर झाल्या. त्यांनी स्वखर्चाने काम करून देतो असा शब्द दिला व आज तो पाळला देखील. आमदारांच्या योगदानाची मुस्लिम समाज जाणीव ठेवेल. मुस्लिम समाज घर बसवनारा आहे तोडणारा नाही, म्हणून ज्यांचा या जागेवर रहिवास होता त्यांचा देखील समाज सहानुभूतीपूर्वक विचार करेल व सदर जागेवर दफनविधी साठी १० लोंकांची समिती बनवून नियोजन बद्ध रीतीने दफन विधी केले जातील अशी ग्वाही दिली.
