पिंप्राळा परिसरातील गरजूंसाठी रुग्णवाहिकेच लोकार्पण

0
15

जळगाव, प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील गरजू नागरिकांसाठी सामाजिक दायित्व निभावण्याच्या हेतूने शिवसैनिक नीलेश पाटील यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले.या रूग्णवाहिकेचा पिंप्राळा परिसरासह इतरही नागरिकांना लाभ दिला जाणार असल्याचे नीलेश पाटील यांनी सांगितले.

नागरिकांची आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता पिंप्राळा परिसरातील नागरिकांसाठी शिवसैनिक नीलेश पाटील यांच्या वतीने शिवसेना जळगाव महानगर तर्फे मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, विराज कावडिया, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, डॉ अस्मिता पाटील, नीलू इंगळे आदी उपस्थित होते.

पिंप्राळा येथील भवानीमाता मंदिराजवळ हा लोकार्पण सोहळा पार पडला. यशस्वीतेसाठी ईश्वर राजपूत, समाधान कोळी, विनोद सुर्यवंशी, संदीप पाटील, रवींद्र कोळी, अजय साळवे, ऋषिकेश कोळी, भय्या वाघ, प्रकाश कोळी, तुषार पाटील, अक्षय राठोड, गौरव राजपुत, सोमसिंग राजपुत, यशवंत राजपूत, रोहित बोरसे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत साळवे यांनी तर आभार अशोक पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here