जामनेर, प्रतिनिधी । पिंपळगाव बु येथील हनुमान मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून असलेले घाणीचे साम्राज्य काही दिवसापासून पसरलेले होते, तरी देखील मंदिराजवळील गाजरी गवताचे व काटीचे झुडपे काढून संपूर्ण परीसर स्वच्छ करण्यात आला.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी गावात विजेच्या धक्क्याने माकडाचा म्रुत्य झाला होता, त्या माकडाचा अंतिम संस्कार करण्यात आला. गावातील रविंद्र महाजन यांच्यासह तरुणांनी हिंदू धर्माच्या पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.