पिंपरी-चिंचवडमध्ये फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न

0
61

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीचा किस करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना काल रात्री पावणे बाराच्या सुमारास घडल्याचं तरुणीने सांगितलं आहे. विशेष म्हणजे यावेळी या तरुणीचा भाऊ देखील तिच्या सोबत असल्याने, जबरदस्तीने किस घेण्याचा प्रकार टळला आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर घटना तक्रारदाराने दिल्याप्रमाणे खाली वाचा.

ही तरुणी आपल्याभावासह रात्री पावणेबाराच्या सुमारास घरी येत होती. या बहिणभावाचा देखील फूडशी संबंधित व्यवसाय आहे, स्टॉलबंद करुन घरी परतत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली. रस्त्यावर कुत्रे भुंकत होते, तेव्हा तिच्या भावाने बाईक थांबवून कुत्र्यांना हाकलले, तेव्हा तो थोडा पुढे गेल्यानंतर, एक ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय बाईकने आला.

या फूड डिलिव्हरी बॉयने तिचा हात मनगटात पकडून, त्याच वेळी अश्लील शेरेबाजी करत तिचा किस करण्याचा प्रयत्न केला, पण त्या तरुणीचा भाऊ परत आल्यानंतर त्याने तिथून धूम ठोकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here