‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

0
32

मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. ‘पावनखिंड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं आहे.

 

हे एक इतिहास वेडा व्यक्तीच करु शकतो. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ते प्रत्यक्षात जगले. या भूमिकेने त्यांना भरभरुन प्रेम दिलं. ज्या मातीत इतिहास घडला, बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे. त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वप्नातलं घर बांधलं आहे.

अजय यांच्या या नव्या घराचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. अजूनही अजय यांच्या घराचं काम सुरु आहे. फोटोमध्ये छोटं पण अगदी सुंदर घर पाहायला मिळत आहे. घराच्या बाहेरील बाजूला लाल आणि राखाडी रंग देण्यात आला आहे. तसेच घराची सुंदर रचना लक्ष वेधून घेणारी आहे. अजय यांचं हे स्वप्नातलं घर खरंच खूप सुंदर आहे.

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची यशोगाथा ‘पावनखिंड’मध्ये दाखवण्यात आली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here