पाळधीतील मृत तरुणीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

0
111

पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
येथे नुकताच प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा काल सकाळी संशयास्पद मृत्यु झाल्यानंतर आता विष प्राशन केलेल्या तिच्या पतीचाही मृत्यु झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरुणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेम होते.यातून त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली होती.तिचा मृतदेह अर्धनग्नअवस्थेत सापडला होता तर मागील खोलीत तिचा पती प्रशांत हा देखील बेशुध्दावस्थेत आढळून आला होता.
आपल्या मुलीचा सासरच्या मंडळीनेच खून केल्याचा दावा तिच्या माहेरच्यांनी करून जळगाव सिव्हिलमध्ये तिचा मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तिचे पार्थिव स्वीकारून सायंकाळी उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान, मयत तरुणीच्या पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच तिचा पती प्रशांत विजयसिंग पाटील याचेवर आज सकाळी क्रूर काळाने झडप घातली. त्याचा मृत्यु विषबाधेमुळे झाल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसून आले आहे मात्र तरुणीच्या पाठोपाठ तिच्या पतीचाही मृत्यु झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here