पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते निंभोरा येथे व्यायाम शाळेचे उदघाटन

0
6

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथे व्यायाम व्यायाम शाळेची जिम साहित्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोरोनाने व्यायामाचे महत्व पटवून दिले आहे. पोलीस, सैन्यदल, निमलष्करी दल भरतीसाठीदेखील व्यायाम आवश्यक आहे. निरोगी समाजासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते तालुक्यातील निंभोरा येथील जय भोले मंदिराजवळ व्यायामशाळेसह जीम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. या व्यायामशाळेचा परिसरातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील हे होते. निंभोरा येथील युवकांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अद्ययावत व्यायामशाळा उभारून आधुनीक साहित्य प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले होते. आज पालकमंत्र्यांच्या हस्ते व्यायामशाळा आणि साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती मुकुंद नन्नवरे, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, युवासेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका प्रमुख पवन पाटील, दामूअण्णा पाटील, सरपंच अशोक पाटील, धीरज पाटील, कैलास पाटील, शाखाप्रमुख नवल पाटील, भागवत पाटील , मुख्याध्यापक प्रमोद पाटील , आदर्श शिक्षक बाळू पाटील , कैलास सोनवणे आदींसह व्यायामप्रेमी तरुणांची उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पंचायत समितीचे माजी उपसभापती डी. ओ. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रमोद पाटील यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आता सर्वांनी लसीकरणावर भर द्यावा. विशेष करून १५ वर्षावरील मुलांसाठी लस आली असून यासाठी आपल्या घरात व परिसरात मुले असल्यास तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here