पाचोर्‍यात तरुणीचा तर चाळीसगावात विवाहितेचा विनयभंग

0
44

पाचोरा/चाळीसगाव : प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणीचा घरात एकटी असतांना तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर चाळीसगाव शहरात एका विवाहाच्या कार्यक्रमास आली असता ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील १९ वर्षीय तरुणी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना घरात कुणीही नसल्याचा फायदा उचलत संशयीत आरोपी गजानन माणिक पाटील (रा.शिंदाड, ता.पाचोरा) याने मद्यधुंद अवस्थेत घरात घुसत पिडीत तरुणीचा उजवा हात पकडत अलिंगन देत पिडीतीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव-हरेश्‍वर पोलीस स्थानकात गजानन माणिक पाटील याच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय माळी हे करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत चाळीसगाव शहरातील ४२ वर्षीय विवाहीत महिला आपल्या पतीसह एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गेली असता संशयीत आरोपी अविनाश वसंत शिसोदे (वय ५२, रा.हायझर अपार्टमेंट, कॉलेज रोड, नाशिक) याने लग्न समारंभाच्या ठिकाणी येत विवाहितेकडून इ-थ्री नावाचे फ्रेंचायसी कोर्सच्या नावाखाली घेतलेले ७ लाख रुपये देण्यास नकार दिला. यामुळे विवाहितेच्या पतीशी संशयीताचे भांडण झाले. भांडणात संशयीत शिसोदे याने विवाहितेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अविनाश सिसोदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.फौजदार धर्मराज पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here