सोयगाव -प्रतिनिधी
बचत गटाची रक्कम भरणा करण्यासाठी पाचोराकडे जाणाऱ्या सोयगावचं दोघांना पाचोरयाकडून येणाऱ्या भरधाव वाहनाने उडवून झालेल्या समोर समोर अपघातात सोयगावचे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना वरखेडी-अंबेवडगाव रस्त्यावर सायंकाळी घडली.
सोयगाव शहरातील नारळीबाग येथील रहिवासी आशा सेविका सौ. सविता काकडे(वय ४०) व विष्णु राजनकर(वय २९) हे दोघे बचतगटाचे पैसे भरण्यासाठी सोयगाव येथून एम.एच.२०/फ,झेड ५९३७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पाचोरा जात असतांना वरखेडी ते अंबे वडगाव दरम्यान वरखेडी येथून जवळच असलेल्या ऑईल मिल जवळ पाचोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या इको गाडी क्र-एम-एच-०२ सी.झेड-८३९९ जोरदार धडक दिल्याने या अपघातात सौ.सविताबाई काकडे व विष्णू राजनकर हे जबर जखमी झाले.
अपघात घडताच जोरदार आवाज आल्यामुळे याच रस्त्याच्या शेतात वरखेडी ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. योगेश चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित रुग्णवाहिका बोलाऊन जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी दवाखान्यात दाखल केले आहे. यादरम्यान ईको गाडी चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता सरळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्याचे समजते,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.सध्या सोयगावचं दोघा गंभीरची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.