पाऊस  नाही वीज नाही ; शेतकरी दुहेरी संकटात

0
29

 भडगाव : प्रतिनिधी
हवामान खात्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी केलेली पूर्वहंगामी कापूस लागवड त्यात पाऊस  नाही विजेचा सुरू असलेला लपंडाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

हवामान खात्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस लागवड केली. त्यात  निव्वळ फसवणूकझाली असुन मानसुम  लवकरच आपल्या भागात दाखल होईल असे सांगणारे हवामान खाते एकदमगु चूप झाले आहे. कमी-अधिक पावसात लागवड केलेल्या कपाशी सुकुन कोमजु लागली आहे. तर कोळगाव वीज केद्रांमधून शेतीसाठी नियमाप्रमाणे आठ तास वीज मिळवायचा पाहिजे मात्र कधी ओव्हरलोड तर कधी लाईट फॉल्टी वेगवेगळे कारणे सांगत शेतकऱ्यांना फक्त एक दीड तास लाईट मिळते डीपी प्रॉब्लेम वाढते तापमान पाणी असून देखील शेतकऱ्यांना पिकालापाणी देता येत नाही.

यावर्षी सुरुवातीपासूनच पिकाला उगवन शक्ती पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही मर प्रादुर्भाव झाला डबल लावणी करावी लागत आहे. विहीर आटली आणि पीक सुकल्याने  शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here