जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे ग्रुप ग्रामपंचायत जव्हार मध्ये आज सकाळी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट एस आर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माझे जिल्हा सदस्य राजधर पांढरे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी उपसरपंच रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गणेश पांढरे राजधर पांढरे एडवोकेट एस आर पाटील रामेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी मानले यावेळी सांडू तडवी शेख चांदतडवी नसृद्दिन तडवी जिल्हा सचिव आदिवासी सचिन कुमावत चेतन रोकडे अर्जुन बारी जामनेर तालुका आदिवासी अध्यक्ष सैराज तडवी महेश सावळे ग्रामसेवक टेमकर तसेच कर्मचारी वृंद ग्रामस्थ तसे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.