जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथे कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात जिल्ह्यात आदर्श निर्माण केलेल्या पहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन पहूरकरांचे मदतीचे हात पुढे सरसावले असून दीड लाख रुपये किमतीचे साहित्य तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहे. याप्रसंगी दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
पहूर शहर पत्रकार संघटनेच्या पुढाकाराने पहूर ग्रामीण रुग्णालयास लोकप्रतिनिधी , व्यापारी , डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन आणि दातृत्ववान ग्रामस्थांच्या सहकार्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर , निवारा शेड , कुलर्स , पंखे , व्हीलचेयर , बेडशीट्स , बकेट्स , मेडिसिन इत्यादी आवश्यक साहित्य प्राप्त झाले.
ग्रामीण रुग्णालयात दात्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार अरुण शेवाळे यांनी भूषविले. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचार्यांचे त्यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल अभिनंदन केले .पहूर गावातील नागरिकांच्या दातृत्वाबद्दलही त्यांनी कौतुक केले . तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , आरोग्यदूत अरविंद देशमुख , आरोग्यदूत प्रफुल्ल लोढा , ऍड .एस .आर . पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज जोशी यांनी केले .यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ .हर्षल चांदा , जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख , सरपंच नीताताई पाटील , सरपंच पती शंकर जाधव , महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे , उपसरपंच श्याम सावळे ,पहूर कसबेचे उपसरपंच राजू भैय्या जाधव , माजी उपसरपंच योगेश भडांगे , माजी उपसरपंच रविंद्र मोरे , माजी उपसरपंच युसूफ बाबा , शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अरुण घोलप ,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर करवंदे , पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील , ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे , भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष सलीम शेख , भारतीय जनता पार्टीचे ओबीसींची तालुका अध्यक्ष वासुदेव घोंगडे , सूर्यकन्या एकता बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष चेतन रोकडे , वैद्यकीय अधिकारी डॉ .जितेंद्र वानखेडे, डॉ संदिप कुमावत, डॉ. संदिप पाटील, डॉ. योगेश ढाकरे, डॉ.किर्ती पाटील, डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पांढरे, खजिनदार डॉ. जितेंद्र घोंगडे, शिवसेनेचे तालुका प्रवक्ता गणेश पांढरे , शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय तायडे , अर्जुन बारी , अब्बु तडवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती .सूत्रसंचालन शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी केले. आभार शरद बेलपत्रे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवींद्र घोलप, रवींद्र लाठे, जयंत जोशी, डॉ. संभाजी क्षीरसागर, किरण जोशी, सादीक शेख, ईश्वर चोरडीया यांच्यासह सर्व पत्रकार बांधव वैद्यकीय कर्मचार्यांनी सहकार्य केले.
असे दाते …असे दातृत्व …!
सुप्रीम कंपनी गाडेगाव, पोलीस स्टेशन पहूर, आणि कै. मैनाबाई रामराव पाटील यांच्या स्मरणार्थ ऍड. एस. आर. पाटील यांनी निवारा शेड उभारून दिले. कोरोनावर यशस्वी उपचार करून सुखरुप घरी आल्याबद्दल लक्ष्मीबाई शामराव राजपूत यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर साठी २२ हजाररुपयांची देणगी दिली. तसेच कृषी पंडित पतसंस्था, जय सप्तशृंगी मॉ. पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, रायचंद सोभागचंद लोढा पतसंस्था, ग्रामपंचायत पहूर पेठ, ग्रामपंचायत पहूर कसबे , मेडिकल असोसिएशन , डॉक्टर्स असोसिएशन , व्यापारी , ग्रामस्थ यांनीही भरीव मदत केली .
यावेळी मान्यवरांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या रुग्ण सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निता पाटील यांनी सत्कार केला. या स्तुत्य उपक्रमामुळे पहूरकरांनी दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.