जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना शाखे तर्फे बोदवड नगरपंचायती व संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे नगरपंचायत ते वर शिवसेनेचा भगवा फडकला म्हणून येथील बस स्टँड परिसरात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जय शिवाजी जय भवानी शिवसेना जिंदाबाद या घोषणेने परिसर दणाणून गेला शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सोयगाव नगरपरिषद व महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार शेठ यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 11 जागेवर विजय मिळून शिवसेनेचा भगवा फडकला तसेच बोदवड नगरपंचायत वर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 17 पैकी 9 जागेवर स्पष्ट बहुमत मिळून शिवसेनेचा भगवा फडकला म्हणून पहूर येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी येथील बस स्टँड परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ जाधव शहर प्रमुख संजय भाऊ तायडे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे माजी शहर प्रमुख सुकलाल बारी युवासेना उपतालुका प्रमुख आमीन शेख अन्सार शेख सादिक पठाण युवा सेना शहर प्रमुख शुभम घोलप योगेश थोरात यांच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते