पहुर.ता.जामनेर, प्रतिनिधी । येथील जैन स्थानक येथे प पु.महासतीजी मंजुश्री जी आदीठाणा ४यांच्या सानिध्यात७दीक्षार्थींचा अभिनंदन समारंभ मोठ्या उत्साहात आज दि.४रोजी सकाळी संपन्न झाला.
पहुर येथील बसस्थानक परिसरातून या दीक्षार्थींची सजविलेल्या वाहनातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व प्रथम वरघोडा कार्यक्रम झाला. यावेळी पपु.महासतीजी मंजुश्री जी यांचे व्याख्यान झाले. विरल निलेश सुराणा(औरंगाबाद),पारसबाई नेमिचंद मोदी(मालेगाव),खुशबू विजय बंब व कोमल विजय बंब(धुळे),मानसी महावीर लुकंड(देवळा),श्वेता विनोद चोरडिया(येवला),अंशिता विनोद बेदमुथा(मांडळ)या दीक्षार्थींचा यावेळी सत्कार तसेच अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी आमदार मनिष जैन व नितिका जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदिप लोढा, पंकज लोढा, प्रितेष लोढा,पवन रुणवाल, बबलु कोचेटा, भैय्या छाजेड, योगेश बेदमुथा, पारस गादीया, आंदीसह संपूर्ण जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दि.२४फेब्रुवारी२०२२रोजी मालेगाव येथे गुरुदेव उत्तमचंदजी महाराज यांच्या हस्ते संसार सुख सोडून संयम मार्ग(दीक्षा) स्विकारणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन अनिल व अतुल कोचेटा यांनी केले.