पवारांचा मेट्रोतून फेरफटका, पुणे मेट्रोच्या कामाची माहिती घेतली

0
84

पुणे : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पुणे मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या कामांची संपूर्ण माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या.

शरद पवार यांचा मेट्रो कामाच्या पाहणी करण्याचा नियोजित दौरा नव्हता. त्यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा जाणून घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मेट्रोचे काम कुठपर्यंत पोहचले? उरलेले काम कधीपर्यंत पूर्ण होईल? कामात काही अडचण येत आहे का? मेट्रोच्या कामासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे आदी माहिती या अधिकाऱ्यांकडून पवारांनी जाणून घेतली.

 

दरम्यान, यावेळी पवारांनी फुगेवाडी ते पिंपरीतील संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. तसेच अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे मेट्रोच्या डब्यात गर्दी झाली होती. पवारांनी मेट्रोतून उभ्यानेच प्रवास केला. या प्रवासातही त्यांनी अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here