पहुर, ता . जामनेर ( प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे येथील उपशिक्षिका पल्लवी रामचंद्र वानखेडे राऊत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा घेण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम पदवी (बी.एड )या परीक्षेत प्रथम वर्षात 92.61% गुण मिळवून सुयश संपादन केलेय.
या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष पंचायत समिती माजी सभापती बाबुराव घोंगडे, संचालक रामचंद्र वानखेडे, मुख्याध्यापिका सौ वैशाली घोंगडे, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे,शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे,केंद्रप्रमुख भानुदास तायडे, कडूबा साहेब वानखेडे संस्थेचे अध्यक्ष डॉ गोपाळ वानखेडे, उपाध्यक्ष गणेश राऊत तसेच सर्व संचालक मंडळ व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.