जळगाव : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन न थांबता पर्यावरण संवर्धन विषय हा मुळात आपले कर्तव्य म्हणून आयुष्यभर अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.माझी वसुंधरा अभियानादरम्यान हरित शपथ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या नवी इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. जमादार, कृषी अधिकारी वैभव शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे उपस्थित होते.
अभियानादरम्यान १५ रोजी हरित शपथ स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहेत. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन दिगंबर लोखंडे यांनी केले.