चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील नानासाहेब य. ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव तसेच चाळीसगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वनविभाग यांच्या आदेशानुसार ” माझी वसुंधरा” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाने दिनांक ८/१/२०२२ रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईन झूम मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगमधे एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी योगेश मंडोळे यांनी विद्यार्थ्यांना ” हरित वासुंधरेची शपथ दिली” दिनांक ०९/०१/२०२२ रोजी दुपारी दोन वाजता ऑनाइन झूम मीटिंगचे मा. प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्या व चित्रकला यांचे निरीक्षण निवड माननिय प्राचार्य महोदयांनी केले.
चाळीसगाव नगरपरिषदेने दिनांक १२/०१/२०२२ रोजी माझी वसुंधरा ह्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व पारितोषिकाची घोषणा केली
१) निबंध स्पर्धा
अ) प्रथम क्रमांक:- कु दिशा रत्नाकर पाटील
ब) द्वितीय क्रमांक:- कु गायत्री मनोज देशमुख
क) तिसरा क्रमांक:- तेजस्विनी भालचंद्र राठोड
२) चित्रकला स्पर्धा
अ) प्रथम क्रमांक:- कु. सोनवणे मिनल माणिक
ब) द्वितीय क्रमांक:- कु. पगारे वैशाली रावसाहेब
क) तिसरा क्रमांक:- देशमुख स्नेहल ऊदय
३) रांगोळी स्पर्धा
अ) प्रथम क्रमांक:- कु. प्रतिक्षा अशोक जोशी
ब) द्वितीय क्रमांक:- कु. कल्याणी राजेंद्र पाटील
क) तिसरा क्रमांक:- देवयानी किरणं पुरकर
ह्या सर्व विजेत्यांना चाळीसगाव नगर परिषदेने दिनांक १३/०१/२०२२ रोजी सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन मा. मुख्याधिकारी मा. ठोंबरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. महाविद्यालयाच्या एकूण १७५ विद्यार्थ्यांनी रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रमात सहभागी झाले होते….
महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. एस. डी. महाजन
डॉ. जी. डी. देशमुख
डॉ. यू. आर. मगर यांनी
विद्यार्थी विकास विभाग
राष्ट्रीय सेवा योजना
राज्यशास्त्र विभाग
यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान पारपाडले..
