परमीट रुमला दिलेली परवानगी रद्द करण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

0
49

जळगाव ः प्रतिनिधी
येथील इंद्रप्रस्थनगर, जनाई नगर, शिवशंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रय नगर, त्रिभुवन कॉलनी या भागातील रहिवासी महिलांनी एकत्रित येत आज आपल्या परिसरातील परमीट रुमच्या विरोधात जिल्हधिकार्‍यांना निवेदन देत त्यांना या परमिट रुमचा परवाना रद्द करण्याबाबत साकडे घातले.
निवेदनात म्हटले आहे की,हा परिसर अतिशय शांतताप्रिय व उच्चभ्रु वस्ती असलेला आहे.आमच्या भागात वसंतराव शामराव चौधरी यांनी नुकतेच दोन वर्षांपूर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे व त्यांनी वर नमूद जागेत नुकतेच हॉटेल व्यवसाय व त्यासोबत दारु विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असून तसे प्रयत्न व हालचाली सुरु केलेल्या आहेत.
या भागातील रहिवाशांना सदर बांधकामाच्या अनुषंगाने सदरचा भाग हा अतिशय दाट लोक वस्तीचा असून त्याठिकाणी संपूर्ण खाजगी रहिवास असून कुठल्याही व्यवासायीक वापरासाठीची जागा नाही.
असे असतांना आयुक्त यांची कायदेशीर रितसर परवानगी न घेता त्याठिकाणी राजाराम हॉलचे बांधकाम करण्यात आलेले आहे व त्याच अनुषंगाने सदर मिळकत धारक वसंतराव चौधरी यांनी नुकतेच कॉलनीतील संबंधी अधिकार्‍यांना संपर्क करून व शेजारी राहणार्‍या लोकांकडे दारू दुकान टाकणेबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.याच भागात दोन खून देखील झालेले आहेत.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून रहिवाशांना त्यांचे जीवन जगणे मुश्किल होणार आहे. याबाबत आपल्या वरिष्ठस्तरावरुन योग्य तो चौकशी अहवालद्वारे भविष्यात सदर दारु विक्री संदर्भ आपणाकडे काही लेखी परवानगीबाबत अर्ज आल्यास आमच्या अर्जाचा विचार होऊन सदर मिळकतधारक यांना कोणत्याही प्रकारची आपल्या कार्यालयाकडून कायदेशीर परवानगी देण्यात येवू नये अन्यथा नागरिक व रहिवाशांचा उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला आहे. या हॉटेल व परमीट रुमला दिलेली परवानगी त्वरीत रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना परिसरातील रहिवाशी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here