जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत काल पक्ष कार्यालयात शहरातील ज्येष्ठ व क्रियाशिल पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, चंद्रकांत नेवे, प्रवीण सपकाळे, शांताताई वाणी, सुरेश उज्जैनवाल, साईमत लाईव्हचे संतोष ढिवरे, मुफ़्ती हारून नदवी, हाफिज रहीम, सना जहांगीर खान, सईद पटेल, अली अंजुम रजवी, कृष्णा पाटील, जुगल पाटिल, प्रसाद जोशी, नितीन नांदुरकर, विलास ताठे आदी पत्रकारांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र भैय्या पाटील हे होते.
आयोजक महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यासपिठावर कार्याध्यक्ष विलास पाटील ,जिल्हा समन्वयक विकास पवार,वाल्मीक पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी,सुनिल माळी, सलीम इनामदार, मजहर पठान वाय. एस. महाजन सर,साहिल पटेल, अकील पटेल, एस एस. पाटिल, महाडीक दादा, स्वप्निल नेमाड़े, ममता तड़वी, जुबेदा तड़वी आदी होते.या वेळी अनेक वक्त्यांनी पत्रकार दिनानिमित आपले मनोगत व्यक्त केले.राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन सर यांनी मोठ्या खुमासदारपणे सुत्रसंचालन केले.