Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धानोरा»पत्रकाराने जास्तीचे मिळालेले ५० हजार रुपये केले परत
    धानोरा

    पत्रकाराने जास्तीचे मिळालेले ५० हजार रुपये केले परत

    saimat teamBy saimat teamMarch 18, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर
    आज प्रामाणिकपणा संपलेला नाही. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे धानोरा (ता.चोपडा) येथील तरुण शिक्षक पत्रकार प्रशांत सोनवणे यांना येथील सेंट्रल बँकेत जास्तीचे मिळालेले ५० हजार रुपये क्षणाचा विलंब न करता त्यांनी लगेच परत केले.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.
    धानोरा येथील पत्रकार व श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रशांत सोनवणे यांचे गावातच ग्राहक सेवा केंद्र आहे. त्या निमित्त बँकेत नेहमीच ये-जा असते. दि.१७ रोजी दुपारी १ वाजता बँकेत दोन वेगवेगळ्या खात्यावरील रक्कम काढली असता त्यात ५० हजार रुपये जास्तीचे आले, असे लक्षात आले. त्यांनी घरी न जाता बँकेत जास्तीचे मिळालेले पैसे बँकेतच परत करुन दिले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक शाखाधिकारी संदीप यादव, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच सुनिता कोळी, उपसरपंच विजय चौधरी, सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी.एस.महाजन, प्राचार्य के.एन.जमादार,
    विकासो चेअरमन पन्नालाल पाटील, विकासो चेअरमन अनिल महाजन, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, विलास सोनवणे, वासुदेव महाजन, सुरेश महाजन, ‘साईमत’चे पत्रकार प्रशांत चौधरी, प्रविण ठाकूर, नाना सोनवणे, राजेंद्र बोदडे, श्री समर्थ वासुदेवबाबा ग्राहक सेवा केंद्राच्या योगेश्‍वरी सोनवणे, विलास सोनवणे, शुभम महाजन, अविनाश सोनवणे, सुनिल मेडीकल, चंद्रकिरण मेडीकल तसेच परिसरातून कौतुक केले जात आहे.
    प्रामाणिकपणा आमच्या अंगात
    लोकांची भांडी घासून नोकरीला लागलो आहे. श्रमाचे मोल आम्ही पिढी घडविण्यासाठी वापरतो. ते स्वतः अंगिकारले आहे. म्हणून लागलीच पैसै परत केले.
    – प्रशांत सोनवणे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Dhanora, Chopda Taluka:वाचन हे स्पर्धा परीक्षेचे आधार कार्ड” – खुशबू महाजन यांचा संदेश

    January 1, 2026

    Chopra : लोणीत गोवंश कत्तलीवरून तरुणांवर प्राणघातक हल्ला

    December 12, 2025

    Mohrad : मोहरद शाळेतील शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांची कडक समज; एकाच दिवशी तीन शिक्षक रजेवर

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.