पतंग उडवताय..! भान राखा पशुपक्ष्यांचे , आपल्या व इतरांच्या जीविताचे…

0
5
चोपडा – मकर संक्रांति पर्वात सर्वत्र पतंगबाजीचे आकर्षण व पतंग उडविण्याचा मोह लहानथोर सर्वांनाच
भुरळ घालतो. या कालावधीमध्ये आकाशात मनमोहक , रंगीत व आकर्षक पतंग उडविण्याची जणू स्पर्धाच अनेकात लागली असते. यासाठी पतंग प्रेमी मंडळी एकमेकांच्या पतंग काटण्यासाठी चीनी मांजा अथवा नायलॉन मांजाचा सर्रास वापर करताना दिसून येतात.
या मांजाला काचेची भुकटी लावून धारदार बनवले असते. या मांजामुळे आकाशात उडणारे मुक्या पक्ष्यांचे
पंख , पाय , मान कापली जाते. पक्षी मृत्युमुखी पडतात.
बऱ्याचदा मांजा झाडांवर अडकून राहतो. तेथे येणारे पक्षी फासात अडकून लोंबकळतात. पतंग उडवल्यानंतर फेकून दिलेला मांजा भटके गुरढोर , कुत्रे यांच्या पोटात खाण्यातून जाऊन त्रास होतो. पतंग काटल्यानंतर खाली पडणारा मांजा रस्त्याने जाणारे तसेच दुचाकीस्वार यांच्या गळ्याला व शरीराला खोल जखम करतात. काही वेळेस नागरिकांना जीव देखील गमवावा लागला आहे. यासारखे अनेक धोके लक्षात घेता नायलॉन मांजा ऐवजी भारतीय बनावटीचा साधा धागा व प्लास्टिक ऐवजी साध्या कागदाचे पतंग उडवून सुरक्षितपणे या सणाचा आनंद घेणे हे अधिक सोयीचे आहे.
पतंग उडविताना घ्या ही खबरदारी…
पक्षी हे भल्या पहाटे पासून सकाळी नऊवाजे पर्यंत व सायंकाळी पाच नंतर उडताना अधिक सक्रिय असतात. त्यामुळे या कालावधीत पतंग उडविणे टाळा. घराच्या छतावरून अथवा गच्चीतून पतंग उडविणे धोकादायक असून तोल जाऊन खाली पडण्याचा धोका असतो. खुल्या मैदानावरून पतंग उडवणे अधिक सुरक्षित असते. इलेक्ट्रिक खांब अथवा तारांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी अजिबात प्रयत्न करू नका. नायलॉन किंवा चिनी मांजाचा वापर करूच नये. मांजा इतरत्र कोठेही फेकून न देता घंटागाडीतच जमा करावा.
सूर्योदय जीवदया अभियानात योगदान द्या…
वरील खबरदारीचे पालन करून देखीलही कोणताही पशू-पक्षी मांजा अथवा कोणत्याही कारणामुळे जखमी झाला, उडण्यास असमर्थ असेल तर तात्काळ खाली नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर निशुल्क सेवेसाठी संपर्क करून योगदान द्या. सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था संचलित सूर्योदय वन्य पशुपक्षी सेवालय द्वारे जखमी व आजारी पक्ष्यांच्या बचावासाठी तत्पर सेवा उपलब्ध आहे. वाचवलेल्या पशुपक्ष्यांना बरे झाल्या नंतर पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येते.
पक्ष्यांसाठी सहाय्यता क्रमांक – 
योगेश – 9881301079 
देवेंद्र –   9011629917 
जयेश – 8767372324
स्वप्निल – 7218152745
संदीप ओली – 8999078971
अनिल शिंपी – 9403282052
हेमराज पाटील – 9922085434 
नायलॉन अथवा चिनी मांजा संबंधी शासन नियम…
नायलॉन / चायनीज मांजाची निर्मिती, साठवणूक , विक्री , व्यापार किंवा वापरावर पूर्णतः बंदी असून याचे उल्लंघन केल्यास वन विभागातर्फे कारवाई करण्यात येते. म्हणून सर्वांनी चायनीज व नायलॉन मांजा टाळून पर्यावरण पूरक पद्धतीने पतंग बाजी व सणाचा आनंद घ्या असे आवाहनवन विभाग व सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here