जळगाव : जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील चांदसर परिसरातील शेतात गुरुवारी राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे परंतु प्रत्येकवेळी राष्ट्रवादीशी गद्दारी करणार्याच्या शेतात राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रशिक्षण शिबिर, असे कडवट टीकास्त्र राष्ट्रवादीचे विधानक्षेत्र प्रमुख रमेश पाटील यांनी नाव न घेता जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्यावर सोडले आहे. दरम्यान, या मेळाव्याबाबत अनेक पदाधिकार्यांना कुठलीही माहिती नसल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे.
गुरुवारी जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्या शेतात राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास नलावडे आणि श्री.साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत. परंतु या मेळाव्याबाबत अनेक स्थानिक पदाधिकार्यांना कुठलीही माहिती अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरुन विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील फेसबुकवर पोस्ट टाकत संताप व्यक्त केला आहे.
एवढेच नव्हे तर, याबाबत प्रवक्ते विकास नलावडे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. संजय पवार यांच्या गावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त १२८ मते होती तर विरोधी उमेदवाराला १२०० मते मिळाली होती.यावरुन संजय पवार यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे सिध्द होते.याच निवडणुकीत नव्हे तर, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप देखील रमेश पाटील यांनी केला आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पणन महासंघाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून अनेकांची नावे वगळल्यामुळे संजय पवार यांच्यावर जोरदार टीका झाली होती.त्यामुळे संजय पवार यांना पक्षाच्या जिल्हा बैठकीत माफीनामा सादर करावा लागला होता.