जळगाव, प्रतिनिधी । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा व महानगरतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत भव्य कोरोना लसीकरण शिबिर सरदार वल्लभभाई पटेल हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटसमोर नागरिकांसाठी भव्य कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले. लसीकरणाचा लाभ सर्व सामान्य लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन केले आहे.
तसेज भाजपा महानगरातील मंडल अध्यक्ष, नगसेवक, आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते यांनी आपआपल्या, मंडलातील, प्रभागातील नागरिकांना भव्य लसीकरणाचा लाभ मिळुन द्यावा असेही सुचित केले आहे. तरी या भव्य कोरोना लसीकरण शिबिराला भाजपा जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडी अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशीं, नितीन इंगळे जिल्हा प्रसिध्दी मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.