पंचनाम्यात ‘नाल्याच्या काठी’ नमूद केल्याने मंडळ अधिकार्‍यांची हुशारी उघड

0
13

यावल ः प्रतिनिधी
यावल येथील जमीन गट नंबर ६९३ ला लागून असलेल्या नाल्यात भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून जमीन लाटण्याचा गोरखधंदा, असे वृत्त ‘दैनिक साईमत’मध्ये दि.२३ मार्च रोजी प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेत यावल मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करताना रॉ-मटेरियल नाल्याच्या काठी टाकून रस्ता करण्यासाठी टाकले आहे, असे नमूद करून आपली हुशारी दाखविली आहे.
यावल येथील फैजपूर रोडवर मनुदेवी मंदिराच्या पाठिमागे सोमवार रस्त्यावर नाल्यात गट नंबर ६९३ च्या बाजुला नाल्यात रॉ मटेरियल टाकून रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय जमीन लाटण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करताना नाल्यात रॉ-मटेरियल टाकलेले असताना तशी पंचनाम्यात नोंद न करता नाल्याच्या काठी रॉ मटेरियल टाकून गट नंबर ६९३ चा रस्ता करण्यासाठी टाकलेले आहे, अशी नोंद पंचनाम्यात करून मंडळ अधिकारी यांनी आपली कायदेशीर पळवाट हुशारी दाखवून संबंधिताला पुढील कारवाईत वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. तरी फैजपूर भाग प्रांताधिकारी यांनी यावल तहसीलदार यांच्यामार्फत त्या ठिकाणचा वस्तुस्थितीजन्य पंचनामा करून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह किंवा सार्वजनिक रस्त्यावर रॉ-मटेरियल टाकून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुढील कडक कारवाई करण्यात यावी, असे यावल शहरात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here