पंकज विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0
4

चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सीआर चौधरी हे होते. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते सी आर चौधरी यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या ,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ यांची जयंती ,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि प्रतापशाली संभाजीराजे छत्रपतींना घडविणाऱ्या मातेच्या आज जन्मदिवस. आई म्हणजे प्रेम, आपुलकी ,प्रेरणा, त्याग, सहनशीलता, जिद्द, संयम, सामर्थ्य यांचा संगम होय.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार जीवनात जर अंमलात आणले तर प्रत्येकाचे जीवन नक्कीच धन्य होईल.
सदर कार्यक्रमासाठी चंद्रकांत जाधव, अनिल पाटील ,दिलीप जयस्वाल ,आर डी पाटील, योगेश चौधरी ,जयश्री पाटील, प्रियांका पाटील ,प्रशांत पाटील ,मनोज अहिरे, महेश गुजर, मयुर पाटील, प्रफुल्ल महाजन, सचिन लोखंडे, नितीन वाल्हे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप बाविस्कर, संदीप पाटील ,रवी शार्दुल, कैलास बोरसे ,प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here