चोपडा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवत दहा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार पालकांसमवेत विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला.
कोविड १९ च्या भयावह परिस्थितीवर मात करत ,ऑनलाइन माध्यमातून अभ्यास करत जिल्ह्यातील २५५ विद्यार्थ्यात चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मयूर कैलास चौधरी ,आयुष किरण पाटील, सोहम प्रवीण पाटील, युतिका संजय महाजन, एकदा नंदलाल मराठे ,अनुष्का सुनील कन्हैये , ओम जगदीश सोनवणे , यशश्री विश्वनाथ चव्हाण, महेश निलेश पाटील, निर्भय भूषण सानप या विद्यार्थ्यांच्या पालकांसमवेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले आपल्या मनोगतात म्हणाले की, १६ मार्च २०२० रोजी शाळा बंदचा शासनाने प्रथमच निर्णय घेतला व २० मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ऑनलाइनच्या माध्यमातून उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे .त्याचे द्योतक म्हणजे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल .विद्यालयाच्या सर्व उपक्रमांना पालकांचे तसेच विद्यार्थ्यांचे नेहमीचे सहकार्य मिळत असते. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा विषयी सखोल मार्गदर्शन केले .कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक शिक्षक सी आर चौधरी व मयुर पाटील यांचा सत्कार संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले , भागवत भारंबे, नारायण बोरोले , गोकुळ भोळे, मुख्याध्यापक एम वी पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश चौधरी ,प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकुर ,सचिन लोखंडे ,नितीन वाल्हे, धनश्री जावळे, दिलीप बाविस्कर , संदिप पाटील, रवि शार्दुल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सी आर चौधरी यांनी केले तर आभार मयूर पाटील यांनी मानले..