न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन

0
27

यावल : प्रतिनिधी (सुरेश पाटील)
दि.१७ फेब्रुवारी२०२२गुरुवार रोजी यावल तालुक्यातील ड़ों.कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधे न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. या उद्धघाटक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षलभाऊ पाटील होते.तर उद्धाटन जिल्हा परिषद सदस्य सौ.सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी झाले.विजेत्या संघाला  प्रथम बक्षीस११हजार रुपये असून द्वितीय बक्षीस ५ हजार १ रुपये आहे.न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ कुंदन दादा फेगडे उपसभापती योगेश दादा  भंगाळे,उदय बाउस्कार,सलीम तडवी सर,सरपंच नवाज तडवी, अजय भालेराव आदी मान्यवर व मंडळी उपस्थित होते.या प्रसंगी दिलीप तायडे,नितीन भिरूड, राजरत्न आढाळे,राजू आढाळे, आशा आढाळे,राहुल आढाळे, जुम्मा तडवी,दगडू तायडे,रवींद्र भालेराव,रवींद्र सोनवणे,रवींद्र आढाळे,अजय तायडे,विकी पांडव,ज्ञानेश्वर आढाळे,मिलिंद आढाळे,नरेंद्र सोनवणे,अनिल लोहार,आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेचे आयोजन संजय आढाळे,बुद्धभूषण आढाळे,नयन ढोके,अरविंद पांडव,यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here