शासकीय यंत्रणा आंधळी आहे का?
यावल (सुरेश पाटील): न्यायालयाच्या पायथ्याशी आणि यावल नगरपालिकेच्या समोर 100मीटर अंतरावर अति प्राचीन अशा बुरुजाची तोडफोड करून शासकीय जागेवर व इतर ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे, यामुळे यावल नगरपालिकेत संबंधित शासकीय यंत्रणा आंधळी आहे का?यावल शहरातील ऐतिहासिक वास्तूंना नष्ट करण्याच्या कुटील कारस्थानाकडे पुरातत्व विभागाचे,विविध सामाजिक आणि काही राजकीय संघटनांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल शहरातून केला जात आहे. यावल शहरात खाटकी वाड्यातुन आठवडे बाजारात जाणार्या प्रमुख रस्त्यावरील अतिप्राचीन बुरुज सुद्धा अतिक्रमणामुळे अदृश्य झाला आहे.इत्यादी ठिकाणांसह अनेक शासकीय कार्यालयांच्या समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने यावल नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,आणि महसूल कार्यक्षेत्रात काही ठराविक नागरिकांकडून मिळेल त्या ठिकाणी शासकीय जागांवर आणि ऐतिहासिक अति प्राचीन वास्तू जवळ,सार्वजनिक तसेच शासकीय मालमत्तेची तोडफोड करून अनधिकृतपणे बेकायदा अतिक्रमण करण्याचा सर्रासपणे, बिनधास्तपणे सपाटा सुरू आहे.
यामुळे वाहतुकीस ठिकठिकाणी मोठे अडथळे निर्माण होत आहेत यावल नगरपरिषदेत तसेच यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात,महसूल विभागात अतिक्रमण विरोधात शासकीय यंत्रणा कार्यरत आहे किंवा नाही?आणि यंत्रणा असेल तर यांनी काय कारवाई केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावल नगर परिषद कार्यालयासमोर फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आणि यावल न्यायालयाच्या पायथ्याशी बुरुजाचे तोडफोड करून अतिक्रमण करण्यात आले हे अतिक्रमण यावल नगरपरिषद मधील यंत्रणेला दिसून आले नाही त्याबाबत संपूर्ण यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे एक स्पष्ट उदाहरण आणि पुरावा यावल नगर परिषदेसमोर आणि संबंधित सर्व शासकीय यंत्रणे समोर असताना सर्व शासकीय यंत्रणा आंधळ्याची भूमिका घेऊन गप्प का?असा प्रश्न उपस्थित केला जात असून याकडे काही सामाजिक राजकीय संघटनांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.यावल शहरातील यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे यावल नगरपरिषद प्रभारी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपले लक्ष केंद्रित करून संबंधित सर्व यंत्रणेवर कार्यवाही करावी ही अपेक्षा यावलकरांनी व्यक्त केली आहे.