नोटीस मिळताच ७२ तासात माफी मागा, अन्यथा…अनिल परबांचा सोमय्यांना अल्टिमेटम

0
6

मुंबई :  प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यानंतर आरोप करणाऱ्या सोमय्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठी परब यांनी संपूर्ण तयारी केली आहे. या तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे परब यांनी तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी सोमय्यांना दिला आहे.

भाजप (BJP) नेते सोमय्यांच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे सामान्य जनतेमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा परब यांनी केला आहे. त्यामुळे परब यांनी त्यांच्या वकिलामार्फत सोमय्या यांना तब्बल १०० कोटी रुपये मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये वरील सर्व आरोपांचा उल्लेख केला असल्‍याचे परब यांचे वकिल सुषमा सिंग यांनी सांगितले.

यापुढे सोमय्या यांनी माझ्यावर असे आरोप करू नयेत, माझ्या संदर्भात केलेले भ्रष्टाचाराबाबतचे असलेले जुने ट्विट डिलीट करावे, माफीनामा मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेतील किमान दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केला जावा, नोटीस मिळाल्याच्या ७२ तासांत नोटिशीतील मागण्या पूर्ण न केल्यास न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा परब यांच्या वकिल सुषमा सिंग यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here