जळगाव, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद जंयती व राजमाता जिजाऊच्या जन्मोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात युवा संवाद अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचा शुभारंभ रंगकर्मी रमेश भोळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कोरोना काळातही संकटाचा सामना करीत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य संगित क्षेत्रातील युवा कलावंत आपली कला जतन व संवर्धन करण्याच कार्य अविरतपणे करीत आहे. देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व जर टिकवायचे असेल तर आपली कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक युवा कलावंताने करायला हवे, असे विचार रगंकर्मी रमेश भोळे यांनीव्यक्त केले. या वेळी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगळे, रंगकर्मी तेजस गायकवाड, अमोल ठाकूर, प्रदीप भोई, कल्पेश नन्नवरे उपस्थित होते. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका समन्वयक कोमल महाजन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. मान्यवरांचे स्वागत सचिन महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी दुर्गेश अंबेकर, सुदर्शन पाटील, मोहीत पाटील, अरविंद पाटील यांनी कामकाज पहिले.