पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी शिवारातील एकाची दुचाकी शेतातून लांबविल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नेरी येथील शेतमजुर रईसखान महेमुदखान पठाण (वय २६) हे शेतीकामानिमित्त नेरी-वडगाव शिवारातील अनिल परशुराम पाटील यांच्या शेतासमोर त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९-डीपी.८११६) ही ५ फेब्रुवारी रोजी लावली होती. काम आटोपल्यानंतर घरी जातांना दुचाकी लावल्याच्या जागी त्यांना दुचाकी दिसून आली नाही. शेतशिवार परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध लावला असता दुचाकी मिळून आली नाही. म्हणून पठाण यांनी पाचोरा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल असून पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आते.