जळगाव, प्रतिनिधी । श्री संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नेत्रज्योती हॉस्पीटल, सिंधी कॉलनी, जळगांव येथे नववर्ष व मकर संक्रांती निमित्त दि. १ ते दि. १५ जानेवारीपर्यंत दुपारी ३ वाजेपासून संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत मोफत नेत्रतपासणी, दंत तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे.
या शिबिरात हॉस्पीटलचे नेत्रतज्ञ डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील, डॉ. श्रुती जोशी व डॉ. अशिषकुमार चांगभले हे डॉक्टर्स मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दंत विभागात डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी , डॉ. सुप्रिया कुकरेजा हे डाक्टर्स तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना फिजिओथेरपी ट्रीटमेंट रेफरल केले आहे अश्या रुग्णांना मोफत फिजिओथेरपी ट्रीटमेंट डॉ. सोनिया केसावणी यांचे मार्फत करण्यात येईल त्यासाठी डॉक्टरांचे सध्याचे रेफरल लेटर गरजेचे असेल.
तरी सर्व समाजातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवाणी, उपाध्यक्ष दिलीप मंघवानी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी व सर्व ट्रस्टीगण यांनी केले आहे.