Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक – माजी मंत्री गिरीश महाजन
    यावल

    नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्याची चौकस बुद्धी आवश्यक – माजी मंत्री गिरीश महाजन

    saimat teamBy saimat teamSeptember 20, 2021No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । नेतृत्व सक्षम असले तरी कार्यकर्त्यांनी आपल्या चौकस बुद्धीचा वापर करायला पाहिजे आणि अशा कार्यकर्त्यांच्या जिवावरच निवडणुका जिंकता येतात भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा शंभर टक्के निवडणुका जिंकणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी यावलं येथील धनश्री चित्र मंदिरात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान प्रमुख मेळावा कार्यक्रमात केले.

    याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रक्षाताई खडसे,भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजना ताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष हिरालालभाऊ चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सुरेश धनके,पद्माकर महाजन, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील,जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष नारायण बापू चौधरी,जिल्हा बँक संचालक गणेश नेहते,मधुकर कारखाना चेअरमन शरद भाऊ महाजन, खरेदी विक्री संघ माजी सभापती नरेंद्रभाऊ नारखेडे,यावल पंचायत समिती सभापती सौ.पल्लवी ताई चौधरी,जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव,पंचायत समिती भाजपा गटनेता दीपक अण्णा पाटील,यांच्यासह आदी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

    आमदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतेवेळी अगोदर या ठिकाणी माजी खासदार तथा आमदार स्व. हरिभाऊची उणीव जाणवते उदार नेता आपल्यातून निघून गेला त्याची आठवण सातत्याने होत असते शक्ती केंद्र बूथ प्रमुख कार्यकर्त्यांच्या भरवशावरच निवडणुका जिंकता येतात निवडणुकांमध्ये कार्यकर्तेच महत्त्वाचे असतात.संघटनात्मक कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा असतो…निवडणूका या कार्यकर्त्यांच्या भरवशावरच जिंकता येतात त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे समर्पित जीवन असलेले देशाचे पंतप्रधान मोदीजी हे लोहपुरुष असून आपल्या देशाच्या आजूबाजूला असलेल्या देशांच्या हालचालींवर ते नजर ठेवून असुन या लोहपुरुषामुळे भारतातील जनता सुखी आहे असे ठासून त्यांनी यावेळी सांगितले आपण घाबरू नका आपण अशा पक्षाचे सदस्य आहेत असा अभिमान वाटायला हवा.काश्मीर मध्ये तिरंगा लावायला कोणी धजावत नव्हते आज काश्मीर मध्ये जीवन एकदम मुक्त असून भाजपची रणनीती मुळे जगाच्या पाठीवर मोदींचे कौतुक होत आहे ठरलं तर काही कठीण नाही नेतृत्व सक्षम असले तर त्याचे नावावर निवडणुका जिंकता येतात हे मात्र तेवढेच खरे आहे.विरोधी पक्षाच्या राज्यातील आघाडी सरकारवर तोंडसुख घेऊन आमदार गिरीश महाजन यांनी राज्यात कोणता वर्ग सुखी आहे शेकडो कोटीचे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे मात्र राज्य सरकारने एक दमडी सुद्धा दिलेला नाही केंद्राने केलेल्या कामगिरीची कार्यकर्त्यांनी जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले तर आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्ह्यात संघटनात्मक रचना पूर्ण झाली असून संघटनेत काम करताना सेवा कशी करावी यावर भर दिला भारतीय जनता पक्ष हा सर्वांच्या सोबत काम करणारा पक्ष असून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा व गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेत यावल तालुक्यातील काही कार्यकर्ते भाऊ आम्ही वंचित आहोत असे सांगतात.मात्र हार झाली असेल तरी खचुन जायचं काम नाही संकटातून मात करून त्यावर विजय कसा मिळवता येईल हे कार्यकर्त्यांचे काम आहे ते मोदीच्या कालखंडात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता विजयश्री खेचून आणल्या शिवाय राहणार नाही असे ठासून राजूमामा भोळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले.

    खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रात मोदी सरकार आहे दोन वर्षाच्या कालखंडात महामारीच्या कालखंडामध्ये एकही गोरगरीब जनतेला उपासमारी मोदीजींनी येऊ दिली नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या नावे वर्षाला सहा हजार रुपये मोदीजींनी दिलेत भारत असा देश आहे की लसीकरण कोरोणाच्या महामारीत फ्री मध्ये देत आहेत यावल तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे संघटनेचे कामकाज चालू आहे यावरून असे दिसते की, येणाऱ्या सर्व निवडणुका100% भारतीय जनता पक्ष जिंकेल यात शंका वाटत नाही.असे सांगून आघाडी सरकारवर शेतकऱ्यांनी केळी पिक विमा च्या संदर्भात घोर पाप केलं होतं ते आंदोलनाच्या मार्फत जुनी ठेवण्यासाठी आपण यशस्वी झालो त्याबद्दल खासदार रक्षाताई यांनी संघटना हे काय? करू शकते हे स्पष्ट पणे सांगितले.

    प्रारंभी कोरोना कालखंडामध्ये मयत झालेल्या कार्यकर्ते व नेते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व प्रमुख अतिथींच्या करकमलानी दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी सचिन पाटील यांनी बुथ प्रमुखांच्या उत्कृष्ट कार्याचा आढावा घेतला. त्यात48शक्तीकेंद्र प्रमुख भागाचे 42शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते,तालुक्यामध्ये204 बुथअसून त्यात प्रत्येक बुथ मध्ये 30 सदस्य असतील याचा आढावा घेतला याप्रसंगी जिल्हा संयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवस पासून तर पुढील सप्ताह पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याची माहिती दिली तर यावेळी यावल शहरातील देशमुखवाडा, तसेच कासवा,सांगवी,कोळवद ग्रामपंचायत सदस्यासह40ते50 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्याचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

    या प्रसंगी पंचायत समिती सदस्य लक्ष्मीताई मोरे,उमेश पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,सुनील नेवे,मिनाताई तडवी,बी.के.चौधरी,नितीन राणे, पिंटू राणे,माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे,माजी सभापती भरत महाजन,देविदास पाटील,किशोर पाटील,किशोर कुळकर्णी,डॉ. कुंदन फेगडे,खेमराज कोळी, राकेश फेगडे,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे यावल तालुका चिटणीस उदय राजाराम बाऊस्कर युवा कार्यकर्ते सागर कोळी, व्यंकटेश बारी,तालुका महिला आघाडी अध्यक्ष विद्याताई पाटील, भाजपा शहराध्यक्ष निलेश गड़े, फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहेते तालुका भरातून भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पिटल मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आली होती त्यामुळे आमदार गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे,यांच्या हस्ते डॉक्टर कुंदन फेगडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केले तर सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम

    December 21, 2025

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.